STORYMIRROR

Shamal Kamat

Inspirational

3  

Shamal Kamat

Inspirational

ऋण फेडूया भारत मातेचे

ऋण फेडूया भारत मातेचे

1 min
11.7K

ऋण फेडूया भारतमातेचे

असे कार्य करूया महान

ज्यामुळे सर्वांनाच वाटेल

तुमचा आमचा अभिमान


सैनिकांच्या माता-पित्यास

वागवू या सन्मानाने

त्यांच्याचमुळे तिरंगा

नभी फडकतो अभिमानाने


शेतकऱ्यांचे कष्ट, मेहनत अनमोल

ठेवून त्याची मनातून जाणीव

मदतकार्य त्यांना करून

दूर करूया त्यांची उणीव


सावित्रीबाईंच्या लेकींना देऊ या

खूप खूप उच्च शिक्षण

अन्याय, अत्याचारापासून

करूया त्यांचे रक्षण


नष्ट करू या जातीभेद

एकोप्याने मिळून मिसळून राहू सारे

भारतात नित्य सदा नांदेल

फक्त प्रेम आपुलकीचे वारे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational