रंगून जाऊ रंगात
रंगून जाऊ रंगात
आला हो सण रंगाचा
*रंगून जाऊ रंगात*
फुलली विविध फुले
आनंद होतो मनात
सण हा येता रंगाचा
रंगोत्सव खेळे सृष्टी
विसरून सारे जाती भेद
समतेची ठेवू या दृष्टी
करु या संवर्धन वनश्रीचे
लोभ मत्सराचे करु दहन
नको तोडणे जाळणे वृक्षाचे
करु पर्यावरण जतन
येता ऋतुंचा राजा
वसंत फुलला मनोमनी
ऐका कोकीळ कुजन
मोहर दिसे वनोवनी
पळस बहावांचे सुंदर
रंग आकर्षती मनाला
रंगून जाऊ रंगात
नको निराशा जीवाला
