रंगपंचमी
रंगपंचमी
राधेच्या रंगात रंगला श्रीकृष्ण
गोप गोपिका विसरले देहभान
यमुनेच्या तीरी खेळ चाले रंगपंचमीचा
एकची झाले वृंदावन
माझा तुझा रंग नसे वेगळा
हरिभक्तिच्या प्रेमाचा तो सोहळा
पसरले सारे रंग गगनात
उरला कुठेच नसे तो द्वैतभाव
देव देवता सारे उधळण करतात रंगांची
राधा हरी नसती भानावरी
साऱ्या रंगांचे रंग वेगळे
परी भाव एकच मनी उरे

