रंगमंच
रंगमंच
जीवन रंगमंचाचा एक प्रवास
सतत जनांना सुखाचा हव्यास
काहींना निमित्त ठरते द्वेषाचे
काहींचे गैरसमज कारण रागाचे
किती खोट्या हस्याचे मुखवटे
हास्यास्पद असती दुसऱ्यांचे काटे
प्रगल्भ विचार नसती कुणात
सगळेच असती नुसते प्रश्नात
बरोबर चालायचं नाटक सर्वांचं
नसे इथं कुणीच कुणाचं
