Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sailee Rane

Tragedy

5.0  

Sailee Rane

Tragedy

रंगमहाल

रंगमहाल

1 min
266


सजला होता रंगमहाल

मिणमिणत्या रोषणाईने

धुंद झालेला होता

त्या मादक अत्तराने


नृत्यांगणेच्या घुंगरावरी

बेहद खुश होतहोते

मनाविरुद्ध मग तिचेही

पाय थिरकत होते


चिमुकला तो निजलेला

आतल्या दरवाजा मागे

भान त्याचेही तिला

होते प्रत्येक पावलामागे


पदरी टाकून पोर कोवळे

अंधारात गेला होता

टीचभर पोटासाठी मग

तिने रंगमहाल सजवला होता


घेऊनि पोर पदरी ती

दारोदार फिरली होती

वखवखलेल्या वाईट नजरांनी

खरं तर ती शिणली होती


खिळतात त्या नजरा

फक्त भूक भागवण्यासाठी

नकोस झालेलं हे जगणं

चिमुकल्याला सांभाळण्यासाठी


नाही राहायचंय तिलाही

या नरकवाण्या रंगमहालात

पण सारेच सत्य नाही ना

घडत अहो या समाजात


पोराची भूक भागवण्यासाठी

खरं तर ती लढत होती

नकोशा झालेल्या आयुष्यात

तरीही रंगमहाल ती सजवत होती


Rate this content
Log in