STORYMIRROR

Snehlata Subhas Patil

Romance

3  

Snehlata Subhas Patil

Romance

रंग

रंग

1 min
255

रंगले जीवन आपुले

लेऊनी विभिन्न छटा

क्षणभंगुर हे जीवन आहे

मौज तयाची लुटा


आयुष्य ही ईश्वराची 

सुंदर कलाकृती आहे

सुखदुःखाच्या रंगांनी

रंगलेली आकृती आहे


इथे स्वप्नानाही

मोजावी लागते किमत

स्वप्नात रंग भरण्याची

असावी लागते हिमत


रंगुनी रंगात साऱ्या

रंग माझा वेगळा

प्रेम रंगी रंगन्याचा

खेळ हा आगळा


रंगांनाही सवय झालीय

रंगात माझ्या रंगण्याची

उरी दुःख लपवून

सुखाचा अभिनय करण्याची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance