STORYMIRROR

Dinesh Kamble

Romance

3  

Dinesh Kamble

Romance

रंग

रंग

1 min
759


चुडा हिरव्या रंगाचा.

गोऱ्या नाजुक हातात...

जेंव्हा किणकिणतात.

हाल जीवाचे होतात...


लाल रंगाची ती मेंदी.

माझ्या नावाने रंगली...

डोळे न्याहाळती तुला.

शांती मनाचीं भंगली...


लाली गालांवर तुझ्या.

जणू पिळला गुलाब...

रूप इतकं देखणं.

शब्द आला लाजवाब...


पीतरंगी तव शालू.

अन पीत तव काया..

घेण्या ती बाहुपाशात

जीव लागला झूराया..


नको दूर उभी राहू.

जरा ये ना जवळ तू..

चिंब भिजू राजा राणी.

प्रेमरंग उधळ तू..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance