STORYMIRROR

Padmakar Bhave

Classics Inspirational

3  

Padmakar Bhave

Classics Inspirational

रंग

रंग

1 min
200

रंगांची सारी दुनिया

रंगांची सारी किमया

रंग रंग विखुरले सारे

रंगून गेले वारे...


रंगीत सारे चेहेरे

रंगांचे हृदय किनारे

रंगात रंगले सारे

रंगीत हृदय धुमारे


रंगीत मुखवटा सारा

रंगीत भावना धारा

अश्रूंची रंगीत वाणी

ओठावर रंगली गाणी


मज ओळखता येईना

तो रंग खरा कळेना..

रंगानी केली मात

रंगास लागली जात.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics