रंग उधळुया आनंदाचे...
रंग उधळुया आनंदाचे...
रंग मिसळती प्रेमात
रंग चित्कारती द्वेष
अनोळखीचे रंग सडे
मनास रंगूनी शेष
रंगात रंगी रंग छटा
रंगात बरसले आसमंत
रंगीचा रंगात सख्यारे
रंगू दे मनो शिखांत
रंगातूनच भाव रंगी
रंगालाच स्पर्श रंगाचा
रंगीच्या महालात रंगे
श्रीरंग रंगे तो राधेचा
रंगातून सूर सजती
सतरंगी ते भावफुले
रंगुनी मग ते मधुर
घेता स्वर्णि रंग झुले
स्वप्नि रंगलेली तीही
सुरेख रांगोळी अंगणी
रंग मनीचे भरतांना
रंगल्या किती आठवणी