STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

4  

Manisha Wandhare

Abstract Romance

रंग रंगवा...

रंग रंगवा...

3 mins
379


शिर्षक - रंग रंगवा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

क्षितीजाचा ओला केशरी भगवा

मिसळला बघा समुद्रात या

धरतीला आता चिंब भिजवा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

प्रेयसीच्या गाली गुलाब फुलवा

गोड खडीतुन आनंद हिरवा

लाजली सखी रूसली सखी मनवा

प्रितीच्या बागेत झुलवा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

मिरेचा रंग अबोल भोळा

राधेच्या डोळ्यात प्रित चांदवा

कृष्ण रंगवून गेला दोघींना

धाडा त्याला प्रित सांगावा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

आईचा उर भरूनी आला

लेकराचे बोल मधूर पावा

गोड गोंडस बाल क्रिडा

पाहूनी तिला दूडदूड धावा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

तिच्याशीवा करमेना

तिला माहेरी जेव्हा पाठवा

तीला सांगु कसे कळेना
जाग येते आठवा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

उंबरठा हा ओलांडून बघा

करती अजुनी कोण धावा

तोडा चौकट जुन्या विचारांची

स्वातंत्र्याचे पक्षी उडवा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

तो विर सिमेवरी उभा

होळीसाठी ना मिळे रजा, बांधवा

तरी उत्साह किती त्याला

मायभुमीला माझ्या रक्ताने सजवा...

रंग रंगवा रंग रंगवा ...

मनात करतो कांगावा

विठू माझा ना भेटला मला

पंढरपुरची शोभा दाखवा

तेव्हाच सुख मिळेल डोळा...

रंग रंगवा रंग रंगवा ...

आयुष्य भक्तांचे तुझ्या नावा

संघर्षातुनी मिळे वाट 

हरु नको चल पुढे पुढे रावा

तुझ्याचसाठी तो शब्द ओला...

रंग रंगवा रंग रंगवा ...

करू नका हेळसांड कुणा

मुक्या जनावरांना लाडवा

सप्तरंगाची उधळण करा

सर्वांना माणुसकीने बोलवा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

निसर्ग आपला सर्वेसवा

जपुन नैसर्गिक साधन वापरा

जपुया या सृष्टीचा ठेवा

चला करूया संकल्प खरा...

रंग रंगवा रंग रंगवा ...

शिक्षणातुनी घडतो इतिहास नवा

आमचे पाने सुवर्णांकित पहा

तुम्ही आता तुम्हालाच घडवा

प्रगतीच्या दिशेने चला ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

तो बाजूने रस्त्याच्या केवीलवाणा

आवाज देतो तुला देवा

हाक ऐकुणी नको कानाडोळा

गरीबाच्या पोटाचा कसला हेवा...

रंग रंगवा रंग रंगवा ...

जीवन म्हणजे एक पुस्तक

पुस्तकात हा सार लपवा

सुख दुःख स्वार एकाच नावेत

सोड चिंता आयुष्य जगवा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

काळोख दाटला वाटेवर

चांदण्यांचा कवडसा मागवा

उजळून टाका दिशे दिशेला

तुच रक्षणकर्ता राघवा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

स्वच्छंदी आसमंती उडू दे

पंख पसरून पारवा

छेडू दे मग मनामनातुनी

मधुर राग मारवा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

चालतांना तुमच्यासवे

हात हातात माझा घ्यावा

आपण सोबती जन्मजन्मांतरीचे

नशीबाचा हा योग पहावा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

झोपला कुठे कुणी उपाशी

दोन घास मग त्याला भरवा

संवेदना आपल्या जागृत

माणुसकीच्या दुष्मनाला हरवा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

शब्द शब्द अंकुरता माझा

बहरून आला बहावा

रचलेल्या शब्दांतुन

रस कवितेचा चाखवा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

आई अंबे दान मागते तुला

करूनी शब्दांचा जोगवा

किरण सोनेरी पडू दे कवितेत

सुर्य मनाचा उगवा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

ओल्या सांजवेळी उतरवु

लेखणीत भावनेचा ओलावा

स्पर्श करूनी जाईल तुला

गुंता मनाचा सोडवा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

शोधिते माझ्या पाऊलखुणा

घेतील माझ्या पाठमोरी मागोवा

मी असेल इथेच चाहूल माझी

शब्द ऐकता कवितेचा गारवा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

उधळूता रंग तारुण्याचा

हिरव्या राणी पेटला वणवा

चांदही पोर्णिमेच्या रात्री मातला

पापण्यांच्या काठी भार हळवा...

रंग रंगवा रंग रंगवा ...

नाजुक क्षणांचा सोहळा

ओठी सर्वांच्या गोडवा

रंग रंग चढता चेहऱ्यावर

खरा खोटा काय ? पुरावा ...

रंग रंगवा रंग रंगवा ...

हिरव्या पर्णी झरते सर

मृदगंध मातीचा बावरा

श्वासांना गंधाळूनी माझ्या

हर्ष मानसी सावरा ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract