STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

4  

UMA PATIL

Inspirational

रंग नवरात्रीचे

रंग नवरात्रीचे

1 min
28.8K


चला सख्यांनो

आपण देवीला पुजूया

गरबा खेळूया

नवरात्रीत.....॥१॥



नवरात्रीचे रंग

रोजचा रंग वेगळा

सण आगळा

प्रत्येकासाठी......॥२॥



हिरवा रंग

प्रतीक आहे समृद्धीचे

निसर्ग वृद्धीचे

सदाहरीत.....॥३॥



निळा रंग

शांततेचा देतो संदेश

लोकांना हितोपदेश

सहकार्याचा.....॥४॥



गुलाबी रंग

सर्वांची वाढवतो प्रीती

जनांची रीती

प्रेमभरली.....॥५॥



केशरी रंग

दाखवतो आपल्याला शौर्य

सैनिकांचे औदार्य

शूरवीरांचे.....॥६॥



कुलस्वामिनी माते

द्यावी आम्हां शक्ती

करतो भक्ती

अंबाबाईची.....॥७॥



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational