रंग असावा
रंग असावा
रंग असावा,
तुकाराम महाराजांच्या अभंगाचा.
रंग असावा,
जिजाऊंच्या प्रेरणेचा.
रंग असावा
शिवरायांच्या विचाराचा.
रंग असावा,
संभाजी राजांच्या पराक्रमाचा.
रंग असावा,
सावित्री माईच्या त्यागाचा.
रंग असावा,
महात्मा फुलेंचा.
रंग असावा,
बाबासाहेबांच्या प्रज्ञा, शिल, करुणेचा.
रंग असावा,
अण्णाभाऊंच्या शाहीरीचा.
रंग असावा,
गाडगेबाबांच्या स्वच्छतेचा.
रंग असावा,
अब्दुल कलामांच्या मिसाईलचा.
रंग असावा,
राजश्री शाहूंच्या विचार सरणीचा.
रंग असावा,
ताराराणीच्या पराक्रमाचा.
रंग असावा,
अहिल्याबाई होळकरांचा.
रंग असावा,
माणसाला माणूस जोडण्याचा.
रंग असावा,
माणसात देव शोधण्याचा.