STORYMIRROR

Shrikant Kumbhar

Inspirational

3  

Shrikant Kumbhar

Inspirational

प्रेम म्हणजे नक्की काय...?

प्रेम म्हणजे नक्की काय...?

1 min
330

मला माझ्या मित्राने विचारले की..

प्रेम म्हणझे नेमके काय...?


मी त्याला सागितले की...


कितीही जवळ जाणार असेल तरी ,

गाडी सावकाश चालव ,

आणि पोहचल्यावर फोन कर.

असे आईच्या काळजाचे बोल म्हणजे प्रेम.


दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता ,

मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे...

महागातले जीन्स आणि कपडे घेणारे,

बाबा म्हणजे प्रेम.


कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी ,

आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे..

आजी-आजोबा म्हणजे प्रेम.


कितीही वाद झाले तरी..

जेवलास का ,

अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम.


पगार कितीही कमी असेल तरी..

"दिवाळीत भाऊबीजला..

बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा"

भाऊ म्हणजे प्रेम.


आणि या सर्वांची काळजी घेवून..

स्वतःची काळजी न करता ,

सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी..

बायको.. म्हणजे प्रेम.


गरजेच्या वेळेला कोणी येवो, अगर न येवो,

आपण त्याला कितीही बोललो,

तरीही रात्री अपरात्री मदतीला धावून येणारा...

मित्र म्हणजे प्रेम.


प्रेम फक्त कपल मध्ये नसते.

सर्व नात्यांमध्ये प्रेम असते,

फक्त तुम्ही जाणून मानून घ्या...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational