STORYMIRROR

Shrikant Kumbhar

Classics

3  

Shrikant Kumbhar

Classics

लेक - सून

लेक - सून

1 min
322

कोण म्हणतं बाईला

      लेकच जवळची असते

      लेक चार घटका लागते

      सून मात्र मरेपर्यंत लागते

माहेरवाशीण लेकीला

चार दिवस खाऊ घालते

आयुष्यभराची पोळी मात्र

बाई सुनेकरताच ठेवते

      परक्याचं धन बोलून लेकीला

      बाई शंभर वेळा टोकते

     काहीही झालं तरी आपल्या घरची

     म्हणत सुनेला नेहमी माफ करते

घरामधली प्रत्येक गोष्ट

बाई लेकीवरच लादते

मात्र सुनेची प्रत्येक गोष्ट

तिच्याच कलेने घेते

     लेकीचं बाळंतपण करून

      बाई लगेच मोकळी होते

       सुनेच्या पोराला मात्र

    दुधावरच्या सायीप्रमाणे जपते

कोण म्हणतं सुनेवर 

सासू अत्याचार करते ?

सासू स्वतःची जागा सोडते

अन ती तर सुनेलाच देते

    फरक फक्त एका शब्दाचा असतो

    शब्दामुळे बदलेल्या नात्याचा असतो

   आईच्या ओरडण्याचं समजावणं होतं

   सासुच्या ओरडण्याचं बोल लावणं होतं....

लेकी सुनेच्या ह्या गोष्टी

रूढींनी आधीच मांडल्या

लेक धान्य पेरत जाते...

अन सून माप ओलांडत येते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics