रम्य ते बालपण...
रम्य ते बालपण...
रम्य ते बालपण
सुखी किती हो जीवन
ना भूतकाळाची आठवण
ना आजची साठवण
ना उद्याची हो काही भ्रांत
सगळेच कसे निवांत
आईच्या एका रट्यातच
मिळे ब्रमंडाचे हो ज्ञान
जखमेवर नुसती फुंकर
वडिलांचे हो त्यावर मलम
तोतरे शब्द घेती ते
आपले समजून-उमजून
कधी ना दिले आपल्याला
काही कमी पडून
आपण ही घ्यावे त्यांना
म्हातारपणी सांभाळून
खरचं,
रम्य ते होते बालपण
तेव्हाच नात्यांची सांदण
जणू आयुष्याला
सुखाचे हो आंदण
रम्य ते बालपण
