STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

5.0  

UMA PATIL

Inspirational

रमाई...

रमाई...

1 min
2.3K


जगात कीर्तिवान दीन-दलितांची आई

सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई... ॥धृ॥


भिमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात

केली हिंमतीने प्रत्येक संकटांवर मात

पुण्यवान, धैर्यशील, हिंमतवान बाई

सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई... ॥१॥


तळा-गाळातील गरीबांच्या रक्षणासाठी

पेटवून तेजस्वी मशाल शिक्षणासाठी

नष्ट केली अंधाऱ्या अज्ञानाची खाई

सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई ... ॥२॥


दलितांच्या उद्धारासाठी झिजवली काया

त्यांची काळजी घेऊन दिली अखंड माया

अमर आहे दुनियेत रमाबाईची पुण्याई

सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई... ॥३॥


दीन-दुबळ्यांच्या न्यायासाठी केला संघर्ष

फुलविले त्यांच्या चेहऱ्यावर सुखाचे हर्ष

भिम झाला बाप, रमा झाली अंगाई

सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई... ॥४॥


आम्हांला दाखवली समतेची वाट

आणली आयुष्यात क्रांतीची लाट

तुझ्या कार्याचे होऊ कसे उतराई ?

सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई... ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational