रक्षाबंधनाचा दुरावा
रक्षाबंधनाचा दुरावा


वेळ आली अशी की जाता येणार नाही मला माझ्या घरी
ऑनलाईन बांधावी लागेल मला माझ्या भावाला राखी
कोरोनाने माजवला आहे हाहाकार
फिरणे ही झाले अवघड फार
भाई लावता येणार नाही मला टिळा तुझ्या माथी
नाही बांधता येणार तुझ्या हातात राखी
नाही ओवाळता येणार तुला दिव्याच्या ज्योतीत
नाही भरवता येणार मिठाईचा तुकडा तुझ्या मुखी
मिळणार नाही आशीर्वादाचा तुझा हात माझ्या माथी
असाच फिका जाणार हा दिवस रक्षाबंधनाचा या वेळी
तरी आपल्या नात्यातला गोडवा नाही होणार कमी
यावेळी रक्षाबंधनाचा दुरावा असला तरी
वाट पाहेन मी पुढच्या रक्षाबंधनाची