STORYMIRROR

Rajesh Varhade

Tragedy

3  

Rajesh Varhade

Tragedy

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
168

सण बहीण भावाचा 

धागा हा रक्षाबंधन 

एकमेकासाठी धाव 

दुःख संकटी धाऊन


कृष्ण द्रोपदी कहानी 

एकवेळ सांगतात 

बोटा इजा होता तिने 

चिंदी शालूची बांधत


शालू नवा होता जरी 

तिने पवा नाही केली 

तिच्या वस्त्रहरणाचे 

वस्त्र कृष्णे पुरवली


तेव्हा पासून उत्सव 

नाते बहीण भावाचे 

प्रण घेतात दिवशी 

एकमेका रक्षणाचे


सण आपण साजरा 

करू देऊन वचन 

माया बहिणीची असे 

भाऊ म्हणून घे प्रण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy