रक्षाबंधन
रक्षाबंधन
रक्षाबंधन
सण आला रक्षाबंधन
बहिणी भावा ओवाळाया
धागा रेशीमाचा बांधून
उदंड आयुष्य मागाया
कुंकू अक्षता कपाळी
ज्योती आरती ओवाळाया
सुत बांधूनीया हाती
वचन रक्षणाचे मागूया.........
सण आला रक्षाबंधन
बहिणी माया कुरवाळाया
बंधु असे मोठा राया
पाया बहिणीचा पडाया
बहिण धाकटी सोनूली
आशीर्वाद देई भाऊ राया
मुखी साखर देऊनी
भेटवस्तू मागाया...........
बहिण सासरी नांदता
भेटी जाई भाऊ राया
ओल्या डोळ्यांनी सजनी
पाटावरी बसे भाऊ राया
भरल्या डोळ्यांनी बहिण
आरती भावाची करूया
दिल्या घरी सुखी रहा
आशीर्वाद आज देऊया..........
सण आला रक्षाबंधन
चला साजरा करूया
भेट बहिणी देवूनी
आशीर्वाद घेवूया
तोंड गोड करूनी
थोडी खोडी ही काढूया
आनांदाच्या परवाला
आनंदाने साजरा करूया..
