STORYMIRROR

Deepak Suryawanshi

Fantasy

2  

Deepak Suryawanshi

Fantasy

पाऊस

पाऊस

1 min
13.9K


पाऊस पाऊस आणि फक्त पाऊस

काही थेंब काही आठवणी

काही क्षण रमत मन आणि

आणि फक्त पाऊस


कधी टीमटीमते काजवे

कधी लपणाऱ्या चांदण्या

कधी गडगडते काळे नभ

आणि फक्त पाऊस


कधी भिजणारा वटवृक्ष

कधी काड्यांच घरट

कधी कावळ्याची छत्री

आणि फक्त पाऊस


कधी भिजलेला रस्ता

कधी साचलेले डबके

कधी डबक्यातला बेडूक

आणि फक्त पाऊस


कधी उडालेली तारांबळ

कधी आडोश्याला झुंबळ

कधी पंढाळीच पाणी

आणि फक्त पाऊस


कधी आसुसलेला शेतकरी

कधी सोन्याचा थेंब

कधी मोत्याची कोंब

आणि फक्त पाऊस


डोक्यात पिशवी

भिजलेल दप्तर

कागदाची होडी

आणि फक्त पाऊस


बहरलेली सृष्टी

हिरवा शालू फुलांची नक्षी

दवाचे मोती भास्कर किरणे

आणि फक्त पाऊस


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy