रिमझिम पावसातली ती
रिमझिम पावसातली ती
बेधुंद पाऊस पडतो आहे
मातीचा सुगंध पसरला आहे
पावसात भिजलेले तुला मी पाहिले
स्तब्ध माझी नजर तुझ्यावर स्थिरावली आहे
होताच ओला तुझा स्पर्श
हलकेच येतात शहारे मनावर
चिंब भिजलेली तुझी नजर
घायाळ करते मला फार
तुला बघताच होतो मी स्तब्ध
स्पर्श तुझा होताच मन होते शिथिल
अंगावर झेलत उभे दोघे जण
गात श्रावण गाणी बेधुंद होऊन

