STORYMIRROR

Asha Padvi

Romance

3  

Asha Padvi

Romance

रिमझिम पाऊस

रिमझिम पाऊस

1 min
14

पावसाची रिमझिम पडत होती अंगणी 

टपोरे थेंब ओघळत होते खिडकीच्या काचेवरून 

मातीच्या सुगंधाच्या जोडीला, चहाचा गंध आवाज देत होता

मधूनच थंड हवेची झुळूक, तनमनाला स्पर्श करून जात होती

रेडिओ वर जुणया गाण्यांचे , स्वर वाजत होते 

अन् आकाशात विजा कडाडून डोल ताशे गाजत होते

कुंडी मधल्या तुळशीला हळूच ,पालवी फुटली होती

उन्हाच्या तेजाने पिवळी झालेली ती, आता हिरवीगार झाली होती

चहूबाजूंनी गारवा येऊन , अंगणात माझ्या पसरत होता

पक्ष्यांचा किलबिलाट कर्णात माझ्या गुंजत होता

हिरवळीचे रान डोळ्यांना माझ्या सुखावत होता

पावसाच्या आगमनाचा आनंद ,ओंजळीत माझ्या मावत नव्हता

रिमझिम पडणाऱ्या सरी , भरभर धरणीवर येत होत्या 

तिला चिंब भिजवून , मिठी तिज देत होत्या 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance