STORYMIRROR

Shravani Balasaheb Sul

Tragedy

3  

Shravani Balasaheb Sul

Tragedy

रहस्यमयी कोडे

रहस्यमयी कोडे

1 min
291

गुंतले धाग्यात धागे

आयुष्य सुटले मागेच मागे

माती उडवत्या वाऱ्यासंगे

हवा मळक्या रंगात रंगे....!


नभात जेव्हा घन दाटे 

नेत्रीचा सागर धास्तीने आटे

रोपट्यास फुलाच्या काटेच काटे

का इंद्रधनुही रंगहीन वाटे....!


शांतता एक भ्रमच हा रे

हृदयी भुकंपाचे असंख्य हादरे

मस्तिष्कातले वादळवारे

स्वहस्ते विध्वंसित स्वतःचे निवारे....!


कथानक कथेचा लिहुनी खोडे

तुटलेल्या तारा सोडण्यास जोडे

थोडे स्थिर पण अस्थिर थोडे

मन हे माझे रहस्यमयी कोडे....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy