रहदारी
रहदारी
झुरळांसारखी वाहानं पळतात रोजच हमरस्त्यांवर
घिरट्या मारी यमदूत घालण्या झडप जीवमात्रांवर.
उलट दिशेने घुसखोर संचरण,नियमांवर बेशिस्त आक्रमण
जाब मागता भांडून-तंटून,नामोहरम करी शासन यंत्रण.
ना सक्तीचे वेग नियंत्रण,बेमूर्वत अपघात आमंत्रण
कवडीकिंमत बहुमोल जीवांची,करून टाकती क्षणात रावण.
स्थळी पोहोचण्या घाई करूनी,नकळत होते स्वर्गावरोहण.
स्वतःचूकीने होऊन जाती,निरपराध जीव -हास कारण.
