STORYMIRROR

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Inspirational

3  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Inspirational

रेडियो स्टार

रेडियो स्टार

1 min
27.4K


तू देशाची शान आहे आणि माझी जान आहे

रेडिओची स्टार तू श्रोत्यांना तुझा अभिमान आहे


कोरलेस नाव रेकॉर्डवर 'लिम्का बुक' मध्ये

आदर्श आहेस तू, तू प्रज्ञावान आहे


करू शकत नाहीत बाकीचे जे डोळस असूनही

ते करुन दाखवले तू, खरंच महान आहेस


सुगृहिणी आहेस तू, माझी सहचारिणी

पळी चमच्याच्या सोबतीने, आहेस माइकधारिणी


केले आहेस गारुड मनावरी श्रोत्यांच्या

आपल्याच मानतेस तू समस्या त्यांच्या


आटोकाट मेहनत तुझी दिवस असो वा निशा

'मिरॅॅकल मस्तीच्या 'राही'ची केवळ तूच आहेस 'दिशा'


'मिरॅकल मसाला' मध्ये तू 'ज्योती' बनून येते

'दीपक' सोबतच श्रोत्यांनाही ज्ञानाचा 'प्रकाश' देते


'विनय'ची 'विद्या' बनून रंगवतेस 'ज्ञानरंगोली'

भुरळ घालते मनामनांवर मधुर तुझी बोली


'ऍना' बनून सादर केला तू 'फॅॅशन धमाका'

'माइकल' सोबत वाढवला मिरॅॅकलचा आवाका


'कायद्याचा आधार' मधून कायदा समजावला

तुझा अनोखा अंदाज, श्रोतामित्रांना भावला


तू सदैव कार्यरत आहे, चिंतन तुझे सदोदीत

हार ठाऊक नाही तुला, नेहमी हवी तुला जीत


प्रत्येक विषय सोपा करण्याची तुझी अनोखी हातोटी

हसतमुखाने पार करते तू प्रत्येक कसोटी


घोडदौड तुझी सुरु राहावी अशीच सातत्याने

दुमदुमत राहो नाव तुझे नवनव्या विक्रमाने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational