रौद्ररूपी पाऊस
रौद्ररूपी पाऊस
रौद्र रूप धारण करून
जेव्हा पडतो पाऊस
हाहाकार सगळीकडे माजवून
सैरावैर करून सोडतो पाऊस
चहूकडे पाणीच पाणी
घरातून बाहेर पडणे मुश्किल
घरातही शिरते पाणी
घरात वीज नाही, संवाद करणे बाहेरच्यांशी मुश्किल
संपलेली साहित्य आणायची सोय नाही
आजारी माणूस राहतो औषध पाण्याशिवाय
गरीबांचे तर हालाही बघवत नाही
कसे जगावे ह्या बिकट परिस्थितीत करावे काय
शेतकऱयांचे हातातोंडाशी आलेले पीक
डोळ्यादेखत जाते वाहून
मागावे लागेल का आता कुणाला भीक
वाटते सगळी परस्थिती पाहून
असा हा रौद्र रुपी पाऊस
नको पाडू देवा
जबाबदार त्याला माणूस
साकळे घालू तरी कसे तुला देवा
