राख
राख
शांत निजलो जेव्हा कलबला कानी आला,
अरे थप्पी लावा लाकडांची अन् गौर्यांची,
पुर्ण जाळा अन् करूनी टाका राख मला...!!
अश्रू नयनातील पाहत होते सर्व करूनी कला,
रडत होतो कुढत होतो जिवंत जेव्हा,
पुर्ण जाळा अन् करूनी टाका राख मला...!!
वय नव्हतच जान्याच काळाने घातला घाला,
खांदा बदलवा म्हनत कोनीतरी पुढे आला,
पुर्ण जाळा अन् करूनी टाका राख मला..!!
चांगला नर होता कसा अचानक गेला,
चार खांद्यावर झोपलो असता हीच कुजबूज,
पुर्ण जाळा अन् करूनी टाका राख मला..!!
बाप निशब्द, आईचा पदर ही ओलाचिंब भिजला,
आपुलकिचा हिंदोळा पाहुन पान्हाच फुटला,
अरे पुर्ण जाळा अन् करूनी टाका राख मला.....
करूनी टाका राख मला..!
