शर्यत
शर्यत
1 min
269
महफिलीत या मी स्वत:ला शोधू शकलो नाही,
इमानी च्या
या ओझ्याखाली स्वार्थाला मुकलो नाही,
घुसमट मी स्विकारली आपुलकिच्या
या शब्दांत चुकलो नाही,
घाव खोलवर होते तरी
या संकटांना खचलो नाही,
स्वप्न पापण्यांखाली दाबले
या स्वप्नांसाठी झुकलो नाही,
आसवांच्या पावसात उभा होतो
पण ओलाव्यानेही भिजलो नाही,
आयुष्याची झिज होतांना
या खळगीसाठी मी हरलो नाही,
स्वत:शीच होती शर्यत माझी
परंतू अजुनही मि जिंकलो नाही.!
