प्रेमरात
प्रेमरात
या रातीला नाव नवे द्यावे,
नात्यात गुंतूनी प्रेम हे फुलवावे...
एकांती प्रेम उंच नभी हे वसावे,
चांदनी ही जनू तू माझी तु माझी...
मि तुझा चंद्र व्हावे...
बरसुनिया बेधुंद गित हे गुणगुणावे...!!
भावना मुक्या बोलताच शब्द हसावे...
वेली ही जनू तू माझी तु माझी...
मि तुझा गंध व्हावे...
रोमा रोमांत शहारे हे फुटावे ....!!
या रातीला नाव नवे द्यावे,
नात्यात गुंतूनी प्रेम हे फुलवावे...
क्षितीजाच्या पल्याडी घरटे हे असावे,
सनई भासे तू माझी तु माझी.
मि तुझा चौघडा व्हावे....
सुर होवूनिया स्वप्न हे पांघरावे....!!
या रातीला नाव नवे द्यावे,
नात्यात गुंतूनी प्रेम हे फुलवावे......

