शोधू कुठे?
शोधू कुठे?
गहिवरते मन माझे तुला शोधू कुठे?
लख्ख प्रकाश पडलाय अंधार्या राती तरीही तुला शोधू कुठे?
आनंद आहे या समयी हरवलेय भान माझे पण तुला शोधू कुठे?
भास आहे जनू तुझा चेहरा चंदेरी हृदयी वेदना पण तुला शोधू कुठे?
गंध दरवळतोय त्या गुलाबाचा अजुनही अश्रू कोरडेच पण तुला शोधू कुठे?
हसने आजही सुमधुर गीत तुझे
बोलने किती सुचे पण आता तुला शोधू कुठे?
लपंडाव भावनांचा स्वप्न सप्तरंगी तुझे तुटले मनी आता तुला शोधू कुठे?
साद होती तुझी गोड मंद सुगावा अर्धवट वाट संपली आता तुला शोधू कुठे?
भेट होती सवे पाखरांचा थवा मंजुळ वारा वादळ दाटले आता तुला शोधू कुठे?
लाजाळू कायेचे प्रतिबिंब काजळी विखूरले क्षण हे आता तुला शोधू कुठे?

