आईपण
आईपण
चुलिवर भाकर टाकतांना जेव्हा बाळ रडते,
हाताला चटके बसत असतांना,
कुशित घेवुन माझ सोनं म्हनुन अलगद त्याला हसवावं...
तेव्हाही आईलाच आईपण यावं,
जरा यालाही प्रेम म्हनावं..!!
घरातील पसारा आवरतांना जेव्हा बाळ रडते,
कंबरेला कळ लागत असतांना,
पाठिचा झोका करून माझं पिल्लू म्हनुन त्याला खेळवावं,
तेव्हाही आईलाच आईपण यावं,
जरा यालाही प्रेम म्हनावं..!!
जेवन करत असतांना जेव्हा बाळ रडते,
अर्ध्या पोटी हात धुत असतांना,
हाताचा पाळना करून माझं छकुलं म्हनुन त्याला गोंजारावं,
तेव्हाही आईलाच आईपण यावं,
जरा यालाही प्रेम म्हनावं..!!
रात्रीला थकव्याने झोपतांना जेव्हा बाळ रडते,
डोळ्यांच्या पापन्या पुसत असतांना,
पापन्यांचा पदर करून माझं वासरू म्हनुन त्याला झोपवावं,
तेव्हाही आईलाच आईपण यावं,
जरा यालाही प्रेम म्हनावं..!!
