STORYMIRROR

Sandeep More

Others

4  

Sandeep More

Others

भविष्याची आरोळी

भविष्याची आरोळी

1 min
376

मन वादळ होऊन सैरावैर घेत होतं उफाळी,

अक्षरं होती त्याने घट्ट पकडली,

तेव्हाच शिकलो मी त्या कविता अन् ती चारोळी.!!

गर्द काळोखात आयुष्याची होत होती राख रांगोळी,

साथ होती फक्त त्या लेखनीची,

तेव्हाच शिकलो मी त्या कविता अन् ती चारोळी.!!

अथांग सागरात ही तडफडतेय जशी मि मासोळी,

पाण्याने होता थोडा भार सोसला,

तेव्हाच शिकलो मी त्या कविता अन् ती चारोळी.!!

बुडतांना स्वप्न दाखवत होती ती रात काळी,

काजव्यांनी केली होती मात्र टेहाळनी,

तेव्हाच शिकलो मी त्या कविता अन् ती चारोळी.!!

जिवन उमगले जेव्हा स्वप्नातील भविष्याने दिली आरोळी,

पुन्हा लढ संदीप व्यर्थ ना तुझी कहानी,

तेव्हाच शिकलो मी त्या कविता अन् ती चारोळी.!!

Rate this content
Log in