प्रेमदिवे
प्रेमदिवे
फांदीवर हिंदोळा घेवुन
बेभान प्रेमात मि पडलो,
अवघड जगने झाले,
मी तिच्यातच गुंतलो.!!
जगण्याला ओढ लावून
स्वप्न नवे पडले,
प्रफ्फुलित मन झाले,
धागे प्रेमाचे गुंफले.!!
बंध नजरेत तिचे
पारिजातका सामावले,
ओंजळीत जग दोघांचे
मिठित अलगद सुखावले.!!
शहारलेले मन माझे
कुशीत नभ दाटले,
पडता प्रतिबिंब हृदयी,
शांत पापणीवर विसावले.!!
मी प्रियकर तुझाच
तू स्वरूप घेतले,
सुख येवो आयुषी,
आनंदी झालर पांघरलेले.!!

