प्रेम अश्रू
प्रेम अश्रू
प्रिये,
गित गाउनिया
जिवनाचे तार
प्रेमाचे छेडिले,
पोकळी झाली मनाची
अन् अश्रू
विरहाचे स्थिरावले..!!
विसावा घेता मी थोडा
नभ भासे
पांघरलेले,
मन असे सुन्न झाले
नयन माझे बावरले...!!
डोळे जनू अजूनही
माझे आहेत
सखे पान्हावले,
मि वेदनेशी घेताच
टाळी प्रेम
माझे ओशाळले..!!
तू असंख्य वार
केले हृदयावर
हसून
मी सावरले,
आठवन येतांना
तुझी बघ अश्रूही
गालावरून ओघळले..!!
