राज्य
राज्य
राज्य कुणाचेही असो
प्रगतीची दिशा हवी
चलनाची हमी हवी
राज्य कुणाचेही असो
अनर्थाचे नको राजकारण
स्वार्थात संपे आपलेपण
राज्य कुणाचेही असो
भरडली जातात मते
विकून नकळत जिंकवते
राज्य कुणाचेही असो
असावी विकास कामे
नसावे कोणी रिकामे
राज्य कुणाचेही असो
असावे ऐकीचे बळ
सहयोगाने असावी चळवळ
राज्य कुणाचेही असो
व्यक्तिगत बाब नसावी
अविरतपणे एकत्र राहावी
राज्य कुणाचेही असो
विचारधारा सन्मार्गी लागावी
सन्मार्गाने प्रगती व्हावी
