पूर्वी आणि आताचे प्रश्न।
पूर्वी आणि आताचे प्रश्न।
पूर्वी मुलं होती सभ्य
प्रेम होतं आईबापावर
भीती वाटे आता
काढतील का मुलं घराबाहेर?।।
पूर्वी होती प्रत्येकाला
दोन तीन मुलं पदरी
आता वाटे कित्येकांना
नको एकही मूल माझ्या घरी।।
पूर्वी करीत होती आदर
वडीलधाऱ्या मंडळींचा
आता वडीलधारे सेवा करिती
आपल्या पाल्यांचा।।
पूर्वी च्या काळी
पुरुष मागे लागतसे स्रियांच्या
आता झाले उलटे
स्रिया मागे लागतात पुरुषांच्या।।
पन्नास वर्षापूर्वी
लग्न पटकन ,घटस्फोट कठीण
आता घटस्फोट लवकर
लग्न जुळण महा कठीण।।
पन्नास वर्षापूर्वी सून
दबकत होती सासू सासऱ्याला
आता थरथर कापती आपल्या
सख्या मुलाला अन सुनेला।।
पूर्वी प्रेम होतं शेजाऱ्यावर
होता आदर त्यांच्याप्रति
आता कुठलाच शेजारी,
शेजारी नको म्हणती।।
पूर्वी लोक भरपूर खात
भरपूर काम, एनर्जी मिळे
आता लोकं घाबरतात खायला
चरबी वाढेल खाल्ल्यामुळे।।
पन्नास वर्षापूर्वी लोक
घाबरत होते सरकारला
आता सरकार विचारी लोकांना
काय हवे तुम्हाला।।
पूर्वी नव्हती कुलपे
दार खिडक्याला
आता मात्र कधीही पहावं
मोठं पॅडलॉक दरवाज्याला।।
पूर्वी नव्हती मिळत
कुठली गोष्ट साधी
आता मात्र सोपं झालंय
ऑनलाइन खरेदी।।
पूर्वी नोकरीसाठी लोक
येत होते खेड्यातून
आता मिळविण्या शांती
लोक जाती शहरातून।।
पूर्वी बँकेतून कर्ज काढणं
होत महाकठीण काम
आता बँकच म्हणते
घ्या पाहिजे तितका दाम।।
पूर्वीचे लोक रमत होते
अभ्यासात अन वाचनात
आता रात्रंदिन रमती
व्हाट्सउप अन फेसबूकात।।
