STORYMIRROR

Shila Ambhure

Tragedy

3  

Shila Ambhure

Tragedy

पूर आसवांचा

पूर आसवांचा

1 min
12.2K


नदीमाय कोपली ती

नेले सारे वाहुनिया

सून्न,बधीर झाले मी

भाऊ दोघे पाहुनिया.


पूर नदीचा निष्ठुर

मायबाप नेले दूर

भाऊ अजाण दोघेही

डोळा आसवांचा पूर.


साद घालितो आईस

परी दिसते ना कुठे

भावनांचे वादळ ते

कसे बालमनी उठे.


पूर ओसरे नदीचा

उरे चिखल नि गाळ.

बंधू मोठा होई पिता

कडेवरी त्याच्या बाळ.


गाली ओघळति अश्रू

डोळे शोधिति आसरा.

घरकुल होते सान

आता नुसता पसारा.


बंधू देतसे समज

नको रडू सानुल्या.

सावरलो तुझ्यासाठी

आईबाप मी तानुल्या.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy