STORYMIRROR

Neeraj Shelke

Fantasy

4  

Neeraj Shelke

Fantasy

पुस्तकं

पुस्तकं

1 min
223

एक स्वप्न होते मनी तयाचे

झेप उंच नभी घ्यावयाचे,

पण कळेना कसे साध्य होईल

धरणीवरून नभास चुंबायाचे!!


भेटले मग एक दिनी

त्यास वाचावयास पुस्तक,

अन् अचानक फिरू लागले 

गरागरा तयाचे मस्तक!!


तरी करुनी निर्धार मनी

तयाने केले वाचन सुरु,

अन् तयाच्या मनात मग

लागली आशेची तग धरू!!


वाचून काढली पुस्तके

अन् बसला मग परीक्षात,

उत्तीर्ण जाहला त्यात गडी

अन् जाऊ लागला अंतरिक्षात!!


पटले महत्व वाचनाचे तयाला

म्हणून अजून सुरु ठेविले वाचन,

अन् आठविता जुने दिवस तयाचे

अचानक ओले होती तयाचे लोचन!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy