STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy Others

3  

Supriya Devkar

Tragedy Others

पुस्तक

पुस्तक

1 min
247

जिवनाचे पुस्तक माझ्या 

किती भरले किती रिते 

मोजावयास येत नाही 

वेचावयाची किती शिते 


आनंदाचे क्षण आले 

भारावून टाकले मजला 

साठवून ठेवावे म्हणता 

व्याप्ती कळे ना त्याची तुजला 


सुखदुःखाची सागंड घालून 

साथीत सरले दिवस किती 

एकटेपणात जगण्याची वाटे

अनाठायी मजला भिती 


नाही काळ जरी हाती आपल्या 

हातात असे आनंदी जगणे

इवल्याशा देहाकरिता कशास 

भरमसाठ इच्छांचे मागणे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy