STORYMIRROR

Prof Purushottam Patel

Classics Inspirational Others

3  

Prof Purushottam Patel

Classics Inspirational Others

पुस्तक विश्व

पुस्तक विश्व

1 min
210

आज २३ एप्रिल: जागतिक पुस्तक दिवस.

त्यानिमित्त सुचलेली ही कविता,...

सर्व पुस्तकं प्रेमींना पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


आज तेवीस एप्रिल विश्व पुस्तक दिवस खास

पुस्तकांशी  करु  मैत्री करु कुविचारांचा नाश


आपली अन् पुस्तकाची जमवू सुंदरशी जोडी

पानावरील ओळींशी जोडू अमृत अक्षर  गोडी


पुस्तक लहान वा मोठे सुविचार सांगते महान

ज्याला लाभे सहवास त्याचा नक्की वाढे मान


पुस्तकाच्या शब्दात वाहे गंगेचे निर्मळ पाणी

ओळी ओळीत तेजाळते गीता वेदांची वाणी


पुस्तकांतून डोकावतात कथा अन् नीतिकथा रसाळ

इसापनीति विक्रम-वेताळ आजीची गोष्ट अतीमधाळ 


पुस्तकाची मैत्री म्हणजे कृष्ण सुदामाची प्रीति

निराश मनाला  जशी  प्रकाश देणारी ज्योती


पुस्तके समजावतात नीति आणि जीवन रिती

एकेक पान शिकवी धिराने चालण्याची गती


पुस्तकाचा पानात वाहते आईची माया-ममता

कोणी नसे सान-थोर शिकविती थोर समता


पुस्तकं  सांगतात राम - कृष्ण शिवबाचा कथा

ज्ञानेश्वरांचे  पसायदान आणि तुकोबांची गाथा


पुस्तकांना समजू आपण जगण्याचे अक्षरधन

ॐ कार शब्द लिहितात रोज प्रसन्न होते मन !


चला!करु श्रीगणेशा!वाचू गुरुजींची श्यामची आई

पुरंदरेंचा शिवबा विसंची ययाति ज्युलियनांची आई


चला…सारस्वतांनो! नोंदवू पुस्तकाच्या शाळेत नाव

कृतकृत्य होईल आपुला चौ-याशी लक्षाचा गाव !



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics