STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

पुस्तक प्रेमाचे...

पुस्तक प्रेमाचे...

1 min
5

कधी तु मला वाचले,

कधी मी तुला वाचले,

या प्रेमाच्या पुस्तकातील,

एक एक पान चाळले ...

पहिल्या भेटीच्या आठवणी ,

प्रत्येक भेटीत ते क्षण जपले ,

तुला जवळून न्याहाळताना ,

तुझे हावभाव अधोरेखीत केले...

तु हसत जवळ येतांना ,

माझ्या हृदयाचे ठोके चुकले,

काय कुणास ठाऊक ,

प्रत्येक क्षणी मी तुला मागीतले ...

रोजचा एक नवा धडा,

प्रेमाचे नवे नवे अध्याय शिकले ,

वाचुन पाठ झाले तेव्हा ,

विषयाचे विषयांतर झाले...

आवडीच्या पुस्तकातले ,

धडे सर्वच बदलले ,

तरी ते पुस्तक मनाच्या कप्प्यात ,

जपुन तसेच ठेवले...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance