पुन्हा
पुन्हा
पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आणी विषय ही तेच,
कधी काळी भंग झाला राहिलय कोणाला समजायच.
नाहीत त्यांना सोडून आहेत त्यांच्या सोबत चालायचे,
सत्य परीस्थिती हीच आहे हे केव्हा उमजायाचे.
कुठच्या कधीच्या राहिल्यात आठवणींनीच्या साठवनी,
दररोज मनाच्या गाभाऱ्यातून करतो त्यांची पाठवणी.
कितिही पडलो तरी सतत उठणे नित्य करतो काम,
झाल गेल होऊन गेल आता उभा आहे ठाम.
तक्रार तुझी काहीच नाही आयुष्याच्या या वळणावर,
शेवटच एकदा तरी भेटून जा माझ्या जळत्या सरणावर.
