पुन्हा या वाटेवर
पुन्हा या वाटेवर
तू नको येऊस पुन्हा या वाटेवर
घडेल तोच गुन्हा पुन्हा या वाटेवर
तुझ्या ओठांना तू दूर घे साजणी
स्पर्श जो घडला होता घडेल पुन्हा या वाटेवर
जाऊन दूर किती तू जाशीन गं
हृदय शोधीत येशील तू पुन्हा या वाटेवर
चांदणं कधीचं हरवलं आभाळातून
फिरशील मागे तर दिसेल तुला ते पुन्हा या वाटेवर
पाऊसही वाट पाहतोय अता माझ्या भिजण्याची
भिजलीस तू ही तर मातीला येईल सुगंध पुन्हा या वाटेवर
मनातील पक्षी अता घरट्यातच कैद होतो
मिळाला तुझा जर एक आसरा उडेल तो पुन्हा या वाटेवर
रस्त्यावरून जाताना एकांत छळतो जगण्यातला
येशील तू जर साथीला जमेल मैफिल पुन्हा या वाटेवर...

