STORYMIRROR

Raakesh More

Romance

3  

Raakesh More

Romance

पुन्हा तिथेच भेटू

पुन्हा तिथेच भेटू

1 min
220

चल आज पुन्हा तिथेच भेटू 

जिथे आपल्या प्रेमाची

सुरुवात झाली 

चल आज पुन्हा तिथेच जाऊ 

जिथे तू माझ्या

जीवनात आली || 0 ||

 

तुझी एन्ट्री हॉलमध्ये होताच 

मनाला सुखद

मिळाला झटका 

त्यानंतर सुरु झाला 

रियाज आलाप 

मुर्की खटका 

समजून घेत होतो आपण 

सम ताली

आणि खाली 

चल आज पुन्हा तिथेच जाऊ 

जिथे तू माझ्या

जीवनात आली || 1 ||

 

गाण्याचा रियाज करायचा होता 

म्हणून आपण हॉलमध्ये

जमलो होतो 

खूप वेळ रियाज करून 

आपण किती 

दमलो होतो 

गाणं गात असताना 

देत होतीस बिट्स वर 

तू टाळी 

चल आज पुन्हा तिथेच जाऊ 

जिथे तू माझ्या

जीवनात आली || 2 ||

 

तुझ्या गाण्यातल्या सुर तालच्या 

चुका मी 

सांगत होतो 

तुझं गाणं सुधारण्यास्तव 

सारं मी 

मांडत होतो 

दुपारी रियाज सुरु झाला 

सुटका झाली 

संध्याकाळी 

चल आज पुन्हा तिथेच जाऊ 

जिथे तू माझ्या

जीवनात आली || 3 ||

 

ग्रुप मधील गायिकांमध्ये 

तुझाच आवाज 

भावतो मला 

तुझा आवाज आवडण्याचं 

कारण आज 

सांगतो तूला 

अशीच असते का ही वेडी 

हृदयाची 

प्रणाली 

चल आज पुन्हा तिथेच जाऊ 

जिथे तू माझ्या

जीवनात आली || 4 ||

 

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance