पुन्हा लढ म्हणा
पुन्हा लढ म्हणा
जिंकुनिया गड किल्ले
सर होईल माती.
हर घरोघरी लावल्या
प्रकाशित ज्योती.....
तुम्ही फक्त लढ असे म्हणा.
अवघ्या कमी वयात झींकलो आम्ही, सह्याद्रीचा डोंगर.
माय भूमी आमची रक्ताहून ही प्यारी,
खुशीने न्याहाळून निघाले सगळे मावळे ओंजर...
तुम्ही फक्त लढ असे म्हणा.
अंधाऱ्या रात्रीची भिती नसावी
फुडें जाण्याची जिद्द असावी.
धार लावूनी तलवारीला रंग चढवला .
वार करून शत्रूंचा नायनाट रक्त पात कळवला...
तुम्ही फक्त लढ असे म्हणा.
जिजाऊच्या पोटी जन्मला वीर शूर छत्रपती शिवाजी.
अनेक गड किल्ले ताब्यात घेऊनी
नाम कमवले त्याच्यासमवेत
अनेक मित्र मंडळी तानाजी येसाजी...
तुम्ही फक्त लढ असे म्हणा.
