पुढे वाटचाल
पुढे वाटचाल
ध्येय गाठण्यासाठी तुला
अखंड चालावंच लागेल
प्रयत्नांची पराकाष्ठा
तुला करावीच लागेल
पराभवाची झोळी
तुला उचलावीच लागेल
पाठीवर झोळी टाकून
तुला पुढं चालावंच लागेल
आज नाहीतर उद्याचा
दिवस तुझा नक्कीच असेल
तो पर्यंत तुला बाळा
पुढं बघून चालावंच लागेल
