पट धुक्याचे
पट धुक्याचे
पट धुक्याचे कोमल
गाणी श्यामल रात्रीची
वृक्षांचिया पायतळी
पाने निजली कधीची
गाई अंगाई अंधार
नभी चांदण्यांचे घोस
दरवळे मध्यरात्री
रातराणी राजरोस
मातीतून येई मग
घमघम अधांतरी
स्वप्नातल्या पाकळ्यांत
लक्ष सुवास लहरी
झंकारत येई सूर
दूर दिव्यांच्या ओळीत
हळुवार वाजे पावा
आणि मनाच्या चाळीत