STORYMIRROR

Chandan Pawar

Romance

4  

Chandan Pawar

Romance

पत्नी...

पत्नी...

1 min
226

पत्नी...

प्रेमाचा अखंड झरा..

सण संसार साजरा..


पत्नी...

भावनांचे दर्पण...

सर्वस्व त्याग-समर्पण..


पत्नी...

उल्हासाचे वादळ..

डोळ्यातील काजळ..


पत्नी...

मनातील काळीज कोंदण..

संसार आभाळातील लखलखत चांदण..


पत्नी..

काळजीचा कोंब..

आठवांचा डोंब..


पत्नी...

प्रित अमृताचा डोह..

आसवांचा विद्रोह...


पत्नी..

पाखरांच्या चोचीतलं गोजिरं गाणं..

सुगंध उधळीत रातराणीचं फुलणं..


पत्नी...

सुख-दुःखाची आण..

साज-शृंगार मिलन..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance