पर्यावरण
पर्यावरण
ओढ लागली
मज निसर्गाची
धुंद मृद्गंधाची
आस वाढली ...
पाना-फुलांनी
रांगोळी घातली
धरणी सजली
तृणांकुरांनी ...
या निसर्गाची
जपणूक केली
वृक्ष अन् वेली
वाढावयाची ...
फळा फुलांचा
आनंद वेगळा
मनात आगळा
मेळा रंगांचा...
डोंगरावरी
झरझर आल्या
नदीस मिळाल्या
पाऊस सरी ...
मार्गात काटा
नसे प्रगतीत
प्रत्येक गोष्टीत
मिळतो वाटा ..
निसर्ग ठेवा
रक्षण करू या
वृक्षही जपू या
फळांचा मेवा ...
अमृत जल
देतेच सरीता
रक्षण करीता
मिळेल फल ...
