STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

पर्यावरण

पर्यावरण

1 min
196

   जीवनाचा प्रवास होई

    वीतभर पोटासाठी,

    क्षणक्षण धावाधाव

    दोन घासाच्या सुखासाठी.


    नशिबाने सुखाचा घास

    ईश्वर देतसे मुखात,

    मानू उपकार त्याचे

    हेच पूर्णब्रम्ह विश्वात..


     अन्न हेच पूर्णब्रम्ह

     करू सेवन स्वानंदे,

     तृप्ती येईल तन-मना

     रमू दीर्घ आनंदे...


     धन-धान्याच्या राशीतून

     सुवास घामाचा येई,

      कष्टातल्या त्या कणांनी

      मन भरून जाई...


    करू नये अवमान

    राबणाऱ्या हातांचा,

    सुखाचा घास मिळतसे

    ध्यास ठेवूनी त्या ऋणांचा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational